रावण या गावचा जावई! माफी मागून लोक दसऱ्याला करतात पूजा

दसऱ्याला देशभरात अधर्मी रावणाचे प्रतिकात्मक दहन केले जाते.

मध्य प्रदेशातील मंदसौरचा एक समाज रावणाची पूजा करतो.

रावणाची पत्नी मंदोदरी ही नामदेव समाजाची कन्या असल्याचे मानले जाते.

त्यामुळे मंदसौर हे रावणाचे सासर मानले जाते.

शहरातील खानापुरा येथे रावणाचा 41 फूट उंच पुतळा आहे.

तिथे काही विशिष्ट समाजाचे लोक रावणाची पूजा करतात.

जावई असल्यानं येथे अगदी विधी-परंपरेनुसार रावणाची पूजा केली जाते.

रावण दहन करण्यापूर्वी येथील लोक क्षमा-याचना करतात.

रावणाच्या पायावर धागा बांधल्याने रोग दूर होतात, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे.