'या' गावचा जावई आहे रावण, दसऱ्याला दहण नाही तर होते पूजा

दसऱ्याला देशभर रावणाचे दहन केले जाते.

पण मध्य प्रदेशातील मंदसौरचा एक समुदाय आहे जेथे लोक रावणाचं दहन नाही तर पूजा करतात.

रावणाची पत्नी मंदोदरी ही नामदेव समाजाची कन्या असल्याचे मानले जाते.

त्यामुळे मंदसौर हे रावणाचे सासरचे घर मानले जाते

शहरातील खानापुरा येथे रावणाचा 41 फूट उंच पुतळा आहे.

जिथे या समाजाचे लोक रावणाची पूजा करतात.

जावई असल्याने येथे विधीप्रमाणे रावणाची पूजा केली जाते.

रावण दहन होण्यापूर्वी लोक माफी मागतात.

येथे रावणाच्या पायावर धागा बांधल्याने रोग दूर होतात असे मानले जाते.