मूड खराब आहे? मग खा हे 5 पदार्थ

प्रत्येकाचा मूड कधी ना कधी खराब होत असतो. त्यामुळे तणाव, नैराश्य चिडचिड होते.

तुमचाही मूड खराब होत असेल तर काही खास फूड खाऊन तुमचा मूड रिफ्रेश करु शकता. 

मूड खराब झाल्यावर तुम्ही अंडी खाऊ शकता. अंडी खाल्ल्याने मेंदूतील सेरोटोनिनचा स्राव वाढतो आणि मूड चांगला राहतो.

टोफूचं सेवन केल्यामुळेही मूड सुधारतो. मेंदूतील भावनिक असंतुलन कमी करुन तणाव कमी करण्यासाठी याची मदत होते. 

टोफूमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील मुबलक प्रमाणात आढळतात जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

मूड सुधारण्यासाठी तुम्ही अननसही खाऊ शकता. अननस खाल्ल्यानं मूड सुधारेल, तणाव कमी होईल.

चीज आणि दुधात ट्रायप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड आढळते, ज्यामुळे मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढते. 

सेरोटोनिन हे एक रसायन आहे जे मूड आणि भावनांवर परिणाम करते. 

डार्क चॉकलेट खाल्ल्यानं मूड सुधारतो आणि हलकं फिल होतं.