चिमूटभर मीठ तुमची त्वचा बनवेल सुंदर, असा करा वापर

मिठाच्या पाण्यात सोडियम, कॅल्शियम, आणि सिलिकॉन सारखे घटक आढळतात जे तुमची त्वचा सुंदर करण्यासाठी मदत करतात.

चेहऱ्यावर मृत त्वचा जमा झाल्याने छिद्र ब्लॉक होतात. तेव्हा ती दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्याचा उपयोग होतो.

सध्या पाण्यात समुद्री मीठ मिसळा आणि हलक्या हाताने मसाज करा. 

एक कप पाण्यात एक चमचा समुद्री मीठ मिसळा आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. काहीवेळाने पाण्याने धुवा.

4 कप पाणी 20 मिनिटं उकळवाआणि त्यात 2 चमचे नॉन आयोडीन युक्त मीठ घाला. ते थंड करून चेहरा धुवा.

मिठाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने कोरडे पण दूर होऊन डाग नाहीसे होतात.

मिठाचे पाणी हे नैसर्गिक डिटॉक्सीफायर आहे. जे त्वचेतील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकते.  

जर तुमच्या चेहऱ्यावर कोणती जखम झाली असेल किंवा चेहेऱ्यावर कोणता कट पडला असेल तर मिठाचे पाणी वापरू नका.