हिवाळ्यात आपण सर्वजण कमी पाणी पितो.

पाणी कमी प्यायल्याने आपण अनेक आजारांना बळी पडतो.

कोरड्या त्वचेचा हिवाळ्यात सर्वाधिक त्रास होतो.

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास कोरड्या त्वचेची समस्या उद्भवणार नाही, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.

डॉ. देवेश चॅटर्जी सांगतात, जेव्हा आपण शरीराच्या गरजेनुसार पाणी पीत नाही तेव्हा त्वचा खूप कोरडी होते.

त्यामुळे सामान्य माणसाने हिवाळ्यात अडीच ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

हृदयविकार, किडनी फेल्युअर आणि लिवर फेल्युअर झालेल्यांनी हिवाळ्यात फक्त एक ते दीड लिटर पाणी प्यावं.

आपल्या शरीरातील सुमारे 60% भाग पाणी आहे आणि दररोज 2.5 लिटर पाणी शरीरातून बाहेर पडतं.

जेव्हा शरीरात 10 टक्के पाण्याची कमतरता असते तेव्हा तहान लागते.

निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत 8-10 ग्लास पाणी पिणे महत्त्वाचे आहे.