अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत मिळतोय Xiaomi 12 Pro 5G, जाणून घ्या ऑफर

स्वस्तात एक फ्लॅगशिप फोन खरेदी करायचा असेल तर Xiaomi 12 Pro वर चांगली ऑफर मिळतेय. हा तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करु शकता.

क्रोमावर यावेळी सेल सुरु आहे. येथून Xiaomi 12 Pro स्वस्तात मिळेल. हा फोन 27,999 रुपयांमध्ये मिळतोय.

प्लॅटफॉर्मवर फ्लॅट डिस्काउंट आहे. यावर कोणतीही टर्म कंडीशन नाही. या हँडसेटचा ओरिजनल प्राइज 62,999 रु. होता. ज्यावर 35 हजारांचं डिस्काउंट मिळतंय.

ही किंमत फोनच्या 8GB RAM+256GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. क्रोमावर ही ऑफर कधीपर्यंत असेल याची माहिती नाही. Amazonवर हा हँडसेट 39,000 रु. आणि फ्लिपकार्टवर 49,999 रु. मिळतोय.

Xiaomi चा हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर काम करतोय. म्हणजे तुम्हाला यात चांगला परफॉर्मेंस मिळेल.

यात 6.73-ich चा AMOLED डिस्प्ले मिळतो. जो 120HZ रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. स्मार्टफोन Android 12 वर बेस्ड MIUI 13 वर काम करतो.

डिव्हाइस 50MP+50MP+50MP च्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. फ्रंटमध्ये कंपनीने 32MP चा सेल्फी कॅमेरा दिलाय.

फोनला पावर देण्यासाठी 4600mAh ची बॅटरी आहे. जी 120W च्या फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, हँडसेट 18 मिनिटात 100 परसेंट चार्ज होतो.

तुम्हाला एक फ्लॅगशिप फोन खरेदी करायचा असेल आणि तुमचं बजेट कमी असेल तर हे ट्राय करु शकता. कंपनी हे तीन वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट आणि 4 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट देईल.