हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे माहिती आहेत का? 

साखरेला गूळ हा आरोग्यदायी पर्याय आहे. गुळात असलेल्या उपचारात्मक गुणधर्मांमुळे तो साखरेपेक्षा आरोग्यदायी मानला जातो.  

गुळात नैसर्गिकरित्या लोह, फोलेट आणि रक्त शुद्धीकरणात मदत करणारे आवश्यक घटक असतात. 

गुळामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामुळे तुमचीप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. 

गुळ खाल्ल्यानं मेंदूला नैसर्गिकरित्या ऑक्सिजन वाढवण्यास मदत होते.मेंदूचं कार्य सुधारतं.

हिवाळ्यात गुळ खाल्ल्यास श्वसनमार्ग, फुफ्फुसे, पोट आणि अन्ननलिका साफ होण्यास मदत होते.

गुळ हा गरम असतो त्यानं शरीरातील चयापचय प्रक्रिया वाढते आणि उष्णता निर्माण होते.

गुळामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. त्यात निरोगी कर्बोदके भरलेली असतात. 

हिवाळ्यात गुळ खाल्ल्याने शरीरातील चयापचय वाढतं त्याचप्रमाणे वजन कमी होण्यासही मदत होते.