कमी किंमतीमध्ये करा हॅण्डबॅग्ज खरेदी!

महिलांच्या रोजच्या आयुष्यात हॅण्डबॅग्ज या महत्त्वाचा भाग बनला आहे.

या बॅगमध्ये आवश्यक साहित्य तर बसतंच त्याचबरोबर चांगला लुकही मिळतो.

एकापेक्षा जास्त हॅडबॅग्ज घ्यायच्या असतील तर त्याचं बजेट सांभाळणंही आवश्यक असते.

पुण्यात तुम्हाला या बॅग्जची कमी किंमतीमध्ये खरेदी करता येईल, असं एक ठिकाण आम्ही सांगणार आहोत.

फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या शिरोळे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स खरेदी करता येतात.

या ठिकाणी तुम्हाला अगदी दीडशे रूपयांपासून वेगवेगळ्या पर्स मिळतात

या पर्सच्या क्वालिटीमध्ये विविधता असून त्यानुसार किंमतीमध्येही फरक आहे.

पर्समध्ये क्लचेस, पाऊच, फायबर पर्स, मेकअप बॅग, सॅक कम पर्स, हेवी डिझायनर पर्सेस या सारख्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या पर्स इथं मिळतात.

अस्सल चिकनकारी साड्यांची ‘इथं’ करा खरेदी