20 रुपयांची नोट पाहताच नवरदेवाने केलं असं की नवरीने मोडलं लग्न Groom and bride holding hand in indian wedding for Hindu rituals नवरदेवापासून लग्नाच्या वरातीतील सर्व नातेवाईक नाचत-गात वधूच्या दारापर्यंत पोहोचले. मुलीच्या कुटुंबाने मोठ्या थाटामाटात लग्नाच्या वरातीचं स्वागत केलं. वरमाळेपूर्वी दोन्ही पक्षांनी लग्नाचे विधी पूर्ण केले. विधीनंतर वराला वरमाळेच्या मंचावर नेण्यात आलं. आनंदाने नवरी जयमाला घेऊन स्टेजवर पोहोचली. मात्र, अचानक नवरदेवाकडे पाहताच तिला संशय आला त्यानंतर मुलाला 5 20-20 च्या नोटा म्हणजेच एकूण 100 रुपये मोजण्यासाठी देण्यात आले. पण वराला त्या नोटा मोजता आल्या नाहीत. विशेष म्हणजे त्याला 20 रुपयांची नोटही ओळखता आली नाही. हे पाहून तरुणीने लग्नास नकार दिला. मुलीच्या या निर्णयावर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्र बसून निर्णय घेतला हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील आहे नवरीने लग्न मोडलं. घरातील इतर सदस्यांनीही नवरीचा हा निर्णय बरोबर असल्याचं म्हटलं.