पुण्यातील ‘या’ आहेत स्वस्तात मस्त 10 हॉटेल्स

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. तसेच आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक दृष्ट्याही हे महत्त्वाचं शहर आहे.

राज्यासह देशभरातून अनेक लोक पुण्यातकामानिमित्त येत असतात. तेव्हा प्रत्येकाला राहण्यासाठी परवडणाऱ्या दरात रिसॉर्ट पाहिजे असतात.

पुण्यात अनेक मोठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत. यातील स्वस्तात मस्त 10 हॉटेल्स आपण पाहणार आहोत.

पुण्यामध्ये राहण्यासाठी अनेक हॉटेल्स रिसॉर्ट उपलब्ध आहेत. अगदी तुम्ही असलेल्या ठिकाणा पासून 5 ते 10 किमीच्या अंतरावर हे हॉटेल्स रिसॉर्ट पाहायला मिळतात.

काही तर दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. अगदी 10 ते 15 हजारांच्या दरांतही रिसॉर्ट उपलब्ध आहेत.

तसेच सर्वांना परवडणाऱ्या दरात देखील उपलब्ध आहेत. अगदी 700 ते 800 रुपयांतही आपली राहण्याची सोय होऊ शकते.

पुण्यात स्वस्तात मिळणाऱ्या काही रिसॉर्टची यादी आहे. आपण आपल्या गरजेनुसार रूम बूक करू शकता.

नाना पेठ, लक्ष्मी रोड परिसरात हॉटेल पराग आहे. तर संगमवाडी हॉटेल शिवकृपा, धायरी हॉटेल अवधूत, एरंडवणे हॉटेल कृष्णा प्रेसिडन्सी आहेत. 

याचबरोबर डेक्कन जीमखाना हॉटेल सपना, चिंचवड हॉटेल सेलिब्रेशन इन, पुणे शहरात पुणे गेस्ट हाऊस, सोमवार पेठ होटेल राजमंदिर, पुणे शहरात हॉटेल गौरव आणि सिंहगड परिसरात हॉटेल जमजीर प्रेसिडन्सी आहेत. 

अरेबिक कुनाफा आता पुण्यात!