Vastu: वास्तुशास्त्राचे 10 उपाय! महत्त्वाची कामं लागतील मार्गी 

वास्तूनुसार, घरामध्ये स्वच्छतेनंतर खाऊच्या पानानं हळदीचे पाणी शिंपडा.

त्यानंतर गंगाजल शिंपडा, यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात.

धार्मिक ग्रंथ-पुस्तके नेहमी घराच्या पश्चिम दिशेला ठेवा.

घरातील देव्हाऱ्यात रोज गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि पूजेनंतर घंटी वाजवा.

घरात शंख ठेवल्याने आणि फुंकल्याने वास्तूदोष दूर होतात.

देवी-देवतांना अर्पण केलेली फुले दुसऱ्या दिवशी काढून नवीन फुले अर्पण करा.

घराच्या दाराजवळ झाडू ठेवू नका किंवा त्यावर कोणतीही ताठ वस्तू ठेवू नका.

जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा झाला असेल तर त्याने दक्षिणेकडे तोंड करून झोपावे.

वंशाच्या प्रगतीसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा.

शुभ मुहूर्तावर आपल्या घराच्या ईशान्य कोपर्‍यात स्फटिक श्री यंत्र स्थापित करा.

घरी फुलदाणीत ठेवलेली फुले सुकली तर नवीन फुले लावा.

घराच्या ईशान्य दिशेला हिरवेगार तुळशीचे रोपे असावे.