पराठा खायला अनेकांना आवडते. पराठ्यामुळे जेवणाची चव वाढते.
छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा भागातील जीजा पराठा हाऊसने तब्बल 125 प्रकारचे पराठे खवय्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
हे जिजा पराठा हाऊस विशाल कश्यप आणि त्यांची पत्नी उज्वला कश्यप यांनी सुरू केले आहे.
शहरातील लोकांना वेगळं काहीतरी देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी हे पराठा हाऊस सुरू केले आहे.
आम्ही सुरुवातीला नेहमीच्या पराठ्यांपासून सुरूवात केली. त्यानंतर पराठ्याचे वेगवेगळे प्रकार सुरू केले.
आज आमच्याकडं तब्बल 125 प्रकारचे पराठे मिळतात.
आलू, मेथी, पालक, गोबी, पनीर, गाजर, ओनियन, मिक्स व्हेजिटेबल पराठ्यासह चीझ पराठा, चीज कॉर्न पराठा, टोमॅटो पराठा हे प्रकार देखील आमच्याकडे मिळतात.
या नेहमीच्या पराठ्यासोबतच शिवशाही, मोगलाई, तिरंगा, शेजवान, मशरूम, मेक्सिकम, इटालियन तसंच ठेचा पराठा देखील आम्ही ग्राहकांना देतो.
60 ते 170 रुपयांपर्यंत हे पराठे मिळतात, अशी माहिती या पराठा हाऊसचे मालक विशाल कश्यप यांनी दिली.