आपल्या सर्वांचे आपल्या जीवनात एक ध्येय आहे आणि ते म्हणजे खूप कष्ट, समर्पण आणि इच्छाशक्तीनं आपल्याला हवं ते साध्य करायचं. खऱ्या आयुष्यातील कथांवर आधारित पाच प्रेरणादायी चित्रपट एकदा पाहायलाच हवेत.
12th Fail (2023)
IPS मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित 12वी फेल हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रत्येकानं एकदा तरी पाहायलाच हवा.
The Pursuit of Happyness (2006)
ख्रिस्तोफर गार्डनर नावाच्या माणसाच्या सत्य कथेवर आधारित हा सिनेमा आहे. एका घटस्फोटित पुरुषाच्या सहा वर्षाच्या मुलासोबतच्या संघर्षाबद्दल आहे,
हृतिक रोशन सुपर 30 हा सिनेमा आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. पटना येथील गणितज्ञ असलेल्या आनंदच्या प्रवासाभोवती कथानक फिरते. त्याच्या मार्गदर्शनाने आणि शिकवण्याच्या पद्धतींनी, 30 आयआयटी इच्छुक विद्यार्थ्यांची बॅच एकाच वेळी परीक्षा पास होतात.
Erin Brockovich (2000)
एका बेरोजगार अविवाहित आईच्या वास्तविक जीवनावर आधारित, ‘इरिन ब्रोकोविच’ हा सिनेमा एकदा पाहायला हवा.
Mission Mangal (2019)
मंगळाच्या कक्षेत इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या सत्य कथेपासून ‘मिशन मंगल’ हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. ही एक प्रेरणादायी कथा आहे.