पुढील वर्ष सुट्ट्यांचं! 2024 मध्ये नोकरदारांना 129 सुट्ट्या

2023 वर्ष संपायला आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत.

नवीन वर्षात अनेकांचे अनेक संकल्प सुरू होणार असतील तर येत्या वर्षासाठी अनेकांनी काही ध्येय किंवा टार्गेट ठरवून घेतले असतील.

नवीन वर्ष आलं की कर्मचारी वर्ग वाट पाहत असतो ते म्हणजे नवीन वर्षाच्या कॅलेंडरची आणि त्यामधील सुट्ट्यांची.

नवीन वर्षातील सुट्ट्यांना धरून नोकरदारवर्ग आपले पुढचे बेत आखत असतो.

तेव्हा 2024 या नवीन वर्षात नेमक्या किती सुट्ट्या मिळणार आहेत याविषयी जाणून घेऊयात.

वर्ष 2024 मध्ये एकूण 52 रविवार आणि 52 शनिवार येणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने जाहीर केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्या आहेत.

त्यामुळे ज्या कर्मचार्‍यांना सार्वजनिक सुट्ट्यांसह शनिवार - रविवारी देखील सुट्टी असते अशांना नवीन वर्षात एकूण 129 सुट्ट्या मिळणार आहेत.

तर ज्यांना केवळ रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या लागू आहेत त्यांना एकूण 76 सुट्ट्या मिळणार आहेत.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा