इंग्रजी वर्णमालेत Z नंतर आहे आणखी एक अक्षर

आजवर आपण  इंग्रजी वर्णमालेत A to Z ही  26 अक्षरंच बोलत आलो.

पण झेडनंतर आणखी एक 27वं अक्षरसुद्धा आहे. ते म्हणजे अँपरसँड (&)

काही वर्षांपूर्वी  ते अल्फाबेटमध्ये  शिकवलंही जात होतं.

& हा लॅटिन शब्द ‘एट’ पासून बनला आहे. ज्याचा अर्थ ‘आणि’ असा आहे.

वर्णमाला वाचताना Z नंतर ‘आणि’ म्हटल्याने वर्णमालेत आणखी काही अक्षर आहे असं वाटलं. 

यामुळे, and ‘per se & असं वाचलं जाऊ लागलं, ज्याचा उच्चार ‘अँपरसँड’ झाला.

हळूहळू अँपरसँडला प्रतीक मानलं गेलं. ते वर्णमालापासून वेगळे केलं गेलं.

कंपन्यांच्या नावांमध्ये आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्येही त्याचा वापर होऊ लागला.