डायबेटिज कंट्रोल करण्यासाठी करा  5 एक्सरसाइज

डायबेटिज ही आरोग्यासंबंधित वाढती समस्या असून जगभरातील अनेक व्यक्ती त्यामुळे पीडित आहेत.

डायबेटिज कंट्रोल करण्यासाठी अनेकजण फक्त गोळ्या औषधांचा आधार घेतात, मात्र औषधांसोबतच विशिष्ट एक्सरसाइज केल्याने डायबेटिज कंट्रोलमध्ये येऊ शकतं.

डायबेटिजच्या रुग्णांकरिता पोहणे हा सर्वात उत्तम व्यायाम आहे.

ब्लड प्रेशरला कमी करण्यासाठी सुद्धा पोहणे हा व्यायाम उपयोगी ठरतो.

पोहण्याचा व्यायाम नियमित केल्याने डायबेटिजच्या रुग्णांमध्ये हृदयासंबंधित आजाराची समस्या कमी होते.

दररोज सायकलिंग केल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी होते.

सायकलिंगमुळे सांधेदुखी कमी होते आणि वजन कमी करण्यासाठी मदत मिळते.

ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही योग अभ्यास सुद्धा करू शकता.

दररोज योगाचे विशिष्ट प्रकार केल्याने डायबेटिज कमी होण्यास मदत होते आणि मानसिक तणाव सुद्धा दूर होतो.

चालणे या व्यायामामुळे शुगरचं नाही तर रक्तदाब सुद्धा नियंत्रित होण्यास मदत मिळते.