द्राक्षे केवळ स्वादिष्टच नाहीत तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत.

द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं आणि ते कमी कॅलरी आणि कमी चरबीयुक्त फळ देखील आहे.

द्राक्षांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हेल्दी ब्लड सर्कुलेशन वाढवतात

तसंच जळजळ कमी करून हृदयरोगाचा धोका कमी करतात.

द्राक्षांमध्ये resveratrol आणि quercetin सारखे कम्पाउड असतात

ज्यात कर्करोगविरोधी गुणधर्म असतात आणि ट्यूमरसारख्या मोठ्या आजारांना रोखण्यास ते मदत करतात.

एवढंच नाही तर द्राक्षांमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करतात.

द्राक्षांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे अनेक डॉक्टर मधुमेही रुग्णांना द्राक्षे खाण्याचा सल्ला देतात.

ते रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी आणि रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

द्राक्षांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन सारखे विविध अँटीऑक्सिडंट असतात, जे डोळ्यांचं मॅक्युलर डिजेनेरेशन आणि इतर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.