नारळ फोडण्यासाठी
5 सोप्या टिप्स
नारळाचा वापर किचनमध्ये विविध पदार्थ बनवण्यासाठी होतो. नारळामुळे अनेक पदार्थांची चव वाढते.
परंतू नारळ फोडणे हे अनेकांना फार कठीण काम वाटते.
तेव्हा नारळ फोडण्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे नारळ सहजपणे फोडला जाईल.
नारळ फोडण्यापूर्वी त्याला 5 मिनिटे गरम पाण्यात ठेवा. यामुळे नारळ सहज फोडला जाईल आणि जास्त मेहेनत घ्यावी लागणार नाही.
तुम्ही नारळ फोडण्यासाठी ओपनरचा देखील वापर करू शकता. तसेच नारळ फोडण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या.
नारळ धुतल्यावर त्याला सुकवल्यावर 40 डिग्री तापमानावर 1 मिनिट ठेवा. यामुळे नारळ सहज फोडला जाईल.
नारळ रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. त्यामुळे नारळ थंड होईल आणि मग त्याला फोडणे सहज शक्य होते.
नारळाची करवंटी साफ करण्यासाठी 2 मिनिटे त्याला गॅसवर गरम करा आणि मग चाकूने ते साफ करा.
महिलांनी कपाळावर कुंकू का लावावं?
हेडिंगवर क्लिक करा