तुमची मुलंही होतील हुश्शार! त्यांना दररोज खायला द्या हे 5 पदार्थ
प्रत्येक पालकाला आपलं मुलं हे हुशार व्हावं असं वाटतं आणि यासाठी पालक खूप प्रयत्न करत असतात.
परंतू मुलं हुशार व्हावी असं वाटतं असेल तर त्यांची बुद्धी तल्लख होण्यासाठी, माईंड शार्प होण्यासाठी काही पोषक तत्त्वांची आवश्यकता असते.
काही पोषक पदार्थ मेंदूच्या वाढीस प्रोत्साहन देतात.
तेव्हा मुलांच्या मेंदूचं आरोग्य चांगलं ठेवणाऱ्या सुपरफूड विषयी जाणून घेऊयात.
हिरव्या भाज्या खाल्ल्याने मेंदूला भरपूर पोषण मिळत. पालक सारख्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई सारखे घटक असतात.
हिरव्या पालेभाज्या मेंदूसह डोळ्यांच्या आरोग्या करता देखील चांगल्या ठरतात.
लहान मुलांच्या आहारात ग्रीक योगर्टचा समावेश केल्यास मेंदूच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
काजू, बदाम, मनुके, पिस्ता आक्रोड यासारखे पदार्थ लहान मुलांच्या मेंदूसाठी फायदेशीर ठरतात.
स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, रासबेरी इत्यादी फळं ही मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात.
बेरीमध्ये असलेल्या अँटी ऑक्सिडंटमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, आयर्न, कॉपर अशी तत्व असतात. यात अनसॅच्युरेटेड फॅट्स देखील असतात.
यामुळे लहान मुलांचा मेंदू चांगल्या प्रकारे कार्य करतो आणि शरीराचा विकासही होतो.
तेव्हा लहान मुलांना दररोज चमचाभर भोपळ्याच्या बिया खायला दिल्यास फायदा होऊ शकतो.
सदर माहिती ही इंटरनेटवर दिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.