साडी हा प्रत्येक महिलेचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय.
त्यामुळे महिलांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांची नेहमी खरेदी केली जाते.
अश्यावेळी बाजारात कोणत्या नवीन प्रकारच्या साड्या आल्या आहेत याचा शोध महिला घेत असतात.
यामुळे पुण्यातील सदाशिव पेठमध्ये 5 हजार पेक्षा जास्त व्हराइटी असलेल्या साड्या मिळत आहेत.
पुण्यातील सदाशिव पेठ येथे असलेल्या जोगेश्वरी सिल्क आणि साडी या दुकानात 5 हजार पेक्षा जास्त व्हराइटीच्या साड्या मिळत आहेत.
या दुकानाचे मालक निखिल पासकंठी आहेत. ते स्वतः विणकर असल्याने अनेक साड्या ह्या ते स्वतः बनवतात.
यामध्ये प्युअर कांजीवरम, प्युअर पैठणी, प्युअर पाटोला अश्या 5 हजार पेक्षा जास्त व्हराइटी साड्या आहेत.
300 रुपयांपासून ते 3 लाखापर्यंत साडीच्या व्हराइटी या ठिकाणी उपलब्ध आहेत.