डोसा तव्यावर चिटकतो? मग वापरा
5 सोप्या टिप्स
डोसा हा दक्षिण भारतातील आवडता खाद्य पदार्थ असून तो बऱ्याचदा नाश्त्यामध्ये खाल्ला जातो.
अतिशय पातळ असणारा हा डोसा चवीला जरी सुंदर असला तरी त्याला बनवणे देखील एक कला आहे.
तेव्हा डोसा तव्याला चिटकू नये म्हणून तो बनवताना काही टिप्स लक्षात घ्या.
ज्या तव्यावर डोसा करणार आहात, तो एकदा स्वच्छ घासून घ्या.
अनेकदा तवा खराब असल्यानेही डोसा तव्याला चिकटतो.
तवा चांगला तापला की त्याच्यावर सगळ्या बाजूने एक चमचा तेल सोडा आणि मग गॅस बंद करा.
तव्यातून वाफा निघू लागल्या की तेल सावकाशपणे कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर मग पुन्हा गॅस चालू करा.
मग तेलकट तव्यावर पाणी शिंपडा आणि नंतर गॅस मंद आचेवर असतानाच त्यावर पीठ टाकून ते अलगद गोलाकार फिरवा.
खूप गरम तवा असेल किंवा गॅस मोठा असेल तरीही डोसा त्याला चिकटून बसतो किंवा फाटतो.
डोसा तव्यावर टाकल्यानंतर त्याच्या गोलाकार तेल सोडा.
मग काहीवेळाने तो तव्यावरून काढून प्लेटमध्ये सर्व्ह करा.