जिंकलस भावा! अभिजीतच्या गाण्यावर चाहते फिदा

बिग बॉस मराठी'च्या कल्ला TV वर एकाहून एक जबरदस्त परफॉर्मन्स होणार आहेत.

 घरातील सर्वच एकापेक्षा एक सदस्य आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने प्रेक्षकांना वेड लावणार आहेत.

सुरांचा बादशाह अभिजीत सावंत त्याच्या आवाजानं सर्वांना वेड लावणार.

बिग बॉसच्या घरात अभिजीतची सुरेल 'सुखाची श्रावणी' अवतरणार आहे.

सर सुखाची श्रावणी हे अभिजीतचं आतापर्यंतच सर्वात हिट मराठी गाणं आहे.

बिग बॉसच्या अभिजीत हे गाणं कधी गाणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

अभिजीतनं या गाण्यानं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकलीत.

अभिजीतच्या गाण्यानं घरातील सगळेच लोक मंत्रमुग्ध झालेत.

घरातील सगळ्या सदस्यांनी अभिजीतच्या गाण्यावर ठेका धरत मुमेंट एन्जॉय केली.