सध्या कुंभ, मीन आणि मकर राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे.
गरीब लोकांना काळी छत्री, घोंगडी, काळे उडीद, शनि चालीसा, काळे तीळ, शूज, चप्पल इत्यादी दान करा.
शनिदेवाची पूजा करण्यासोबतच शनिवारी कावळ्यांना आणि काळ्या कुत्र्यांना भाकरी खाऊ घातल्यानं तुमचं नशीब उजळू शकतं.
ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांच्या कुंडलीत साडेसाती चालू आहे, त्यांनी शनिवारी बीज मंत्राचा (ऊँ ऐं ह्रीं श्रीं शनैश्चराय नमः) 108 वेळा जप करावा.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.
पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
शंभू महादेवाची पूजा केल्यानंही शनिदेवही प्रसन्न होतात.