'या' 7 अभिनेत्यांनी Onscreen बजावली महात्मा गांधींची भूमिका
आज महात्मा गांधींची 154 वी जयंती आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक कलाकारांनी पडद्यावर राष्ट्रपित्याची भूमिका साकारली आहे.
चला त्यांपैकी काही गाजलेल्या भूमिकेबद्दल आणि ती साकारलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेऊ
नसीरुद्दीन शाह: या दिग्गज अभिनेत्याने कमल हसन दिग्दर्शित हे राम (2000) या चित्रपटात महात्माची भूमिका केली होती.
बेन किंगले : या इंग्लिश अभिनेत्याने रिचर्ड ऍटनबरो दिग्दर्शित गांधी (1982) या चित्रपटात बापूची भूमिका केली होती. त्याच्या भूमिकेसाठी त्याला ऑस्कर मिळाला.
दिलीप प्रभावळकर: राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'लगे रहो मुन्ना भाई' (2006) मध्ये या अभिनेत्याने मोहनदास करमचंद गांधी यांची भूमिका केली होती.
अन्नू कपूर: केतन मेहता दिग्दर्शित सरदार (1993) या चित्रपटात या अभिनेत्याने महात्मा गांधीची भूमिका साकारली होती.
दर्शन जरीवाला: अभिनेत्याने फिरोज अब्बास खान दिग्दर्शित गांधी, माय फादर (2007) मध्ये गांधीजींची भूमिका केली होती. त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
रजित कपूर: या अभिनेत्याने श्याम बेनेगल दिग्दर्शित द मेकिंग ऑफ द महात्मा (1996) मध्ये बॅरिस्टर महात्मा गांची भूमिका केली होती. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
दीपक अंतानी: या अभिनेत्याने राजकुमार संतोषी दिग्दर्शित गांधी गोडसे – एक युद्ध (२०२३) मध्ये महात्मा गांधींची भूमिका साकारली.