सुशांतचा मृत्यू झाला, त्याच घरात राहते ही अभिनेत्री!
सुशांतचा मृत्यू झाला, त्याच घरात राहते ही अभिनेत्री!
सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू त्याच्या राहत्या घरात झाला. त्यानंतर तो फ्लॅट विकत घ्यायला किंवा तिथे राहायला कोणी तयार नव्हतं.
आता ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री सुशांत सिंहचा फ्लॅट खरेदी केला आहे.
‘बस्तर द नक्सल स्टोरी’ अभिनेत्री अदा शर्मा तिच्या कामासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
अभिनेत्रीनं सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला ते घर भाड्यानं घेतल्याची माहिती आहे.
एक दोन नाही तर पुढची पाच वर्ष अदा या घरात राहणार आहे.
ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, अदा शर्माने ऑक्टोबर 2023 मध्ये लीज करारावर सही केली आहे.
अभिनेत्री या वर्षाच्या सुरुवातीपासून तिची आई आणि आजीसोबत इथं राहत आहे.
तसंच अदाने या घरात तिला सकारात्मक वाइब्स येतात अशी माहिती दिली आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी या घरात पहिल्यांदा अदा शर्मा राहत आहे.