अदिती-सिद्धार्थनं केलं दुसरं लग्न!

अदिती-सिद्धार्थनं केलं दुसरं लग्न!

अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने अभिनेता सिद्धार्थशी लग्न केलं आहे.

अदिती गेल्या अनेक दिवसांपासून साऊथ अभिनेता सिद्धार्थला डेट करत असल्याची माहिती आहे.

अनेक वर्षाच्या डेटिंगनंतर आता या दोघांनी हैदराबाद मध्ये गुपचूप लग्न केल्याचं बोललं जातंय.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे.

अदिती आणि सिद्धार्थ या दोघांचाही पहिला संसार मोडलेला आहे.

अदिती राव हैदरीचं पहिलं लग्न अभिनेता सत्यदीप मिश्राबरोबर झालं होतं.  2013 साली तिचा घटस्फोट झाला.

सिद्धार्थचं पहिलं लग्न 2003 साली झालं होतं. लग्नानंतरच चार वर्षातच 2007 मध्ये त्याचा घटस्फोट झाला.

सिद्धार्थ आणि अदिती यांच्यात 8 वर्षांचं अंतर आहे.

आता दोघांनीही एकमेकांसोबत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.