उन्हातून आल्यावर 30 मिनिट थांबा, या गोष्टी करु नका!

सध्या देशातील बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे. 

वाढत्या उष्म्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

उन्हाळ्यात डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका असतो. यामुळे आजारपणाचा धोका वाढतो. 

केवळ उन्हामुळे आरोग्य बिघडत नाही तर काही वेळा आपल्या चुकांमुळे देखील आरोग्य बिघडू शकते. 

उन्हातून आल्यावर काही चुका करणं प्रत्येकानं टाळलं पाहिजे.

उन्हाळ्यातून आल्यावर पचायला जड पदार्थ, तळलेले पदार्थ खाऊ नये. 

उन्हातून आल्यावर लगेच कूलर किंवा गारव्यात बसू नका. अचानक तापमान बदलल्याने सर्दी, खोकला, अॅलर्जीसारख्या होऊ शकतो. 

उन्हाळ्यातून आल्यावक थंड पाणी, फ्रीजमधले पदार्थ किंवा आइस्क्रिम खाऊ नये. 

उन्हातून आल्यावर लगेच अंघोळ करुन नका. यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते.