मान्सून पर्यटनासाठी खुणावतोय सह्याद्री
मान्सून पर्यटनासाठी खुणावतोय सह्याद्री
सह्याद्री पर्वतरांग हे महाराष्ट्राला लाभलेलं सर्वात मोठं वरदान असून जगभरातील लोकांचं आकर्षण केंद्र आहे.
पावसाळा सुरू झाला की हिरवाईने नटलेला निसर्ग, डोंगर दऱ्या, झाडे-वेली, पशु-पक्षी पर्यटकांना भुरळ घालतात.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत अनेक नैसर्गिक, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत.
संपूर्ण सह्याद्रीचंच रूप मनोहरी असून त्याचे फोटो पाहिले तर डोळ्याचं पारणं फिटतं.
अहमदनगर जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असून पर्यटनस्थळांवर पर्यटक गर्दी करत आहेत.
पर्यटक सह्याद्रीचं निसर्ग सौंदर्य आपल्या कॅमेरात कैद करत आहेत.
पर्वतरांगांनी पांघरलेली धुक्याची चादर ही पर्यटकांसाठी निसर्गाची एक भेटच म्हणावी लागेल.
पर्यटनाची ठिकाणंच नाही तर अपरिचित डोंगरदऱ्यांचं विलोभनीय सौंदर्य पाहूनही तृप्त होतं.
आपणही पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्याच्या विचारात असेल तर सह्याद्री हा उत्तम पर्याय आहे.