पर्यटनाच्या राजधानीत काय पाहाल?
पर्यटनाच्या राजधानीत काय पाहाल?
महाराष्ट्रातील पर्यटनाची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे.
ऐतिहासिक वारसा आणि वास्तूंनी समृद्ध या जिल्ह्यातील ही 10 ठिकाणे पाहिलीच पाहिजेत.
छत्रपती संभाजीनगरपासून 100 किमी अंतरावर जगप्रसिद्ध अजिंठा बौद्ध लेणी आहेत.
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी ही संभाजीनगर शहरापासून 30 किमी अंतरावर वेरूळ गावात आहेत.
ताजमहलची प्रतिकृती असणारा बीबी का मकबरा ही वास्तू आवर्जून पाहावी अशी आहे.
रशियामधील गझनवाद येथून आलेले हजरत बाबा शहा मुसाफिर यांनी पाणचक्की बांधली.
संभाजीनगरपासून 16 किलोमीटर अंतरावर दौलताबाद म्हणजेच देवगिरीचा किल्ला आहे.
अंतूर किल्ला हा अजंठा-सातमाळा या सह्याद्रीच्या पूर्वपश्चिम उपरांगेवर मोक्याच्या ठिकाणी आहे.
शयनावस्थेत असणारे भद्रा मारुती मंदिर संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये आहे.
घृष्णेश्वर महादेव मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून वेरूळ लेण्यांपासून अगदी जवळ आहे.
सिद्धार्थ उद्यान हे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी आहे.
औरंगाबाद लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरातील बौद्ध लेणी असून ती डोंगरात खोदलेली आहे.