ठाकरेंच्या टीमचं मोठं यश, शोधली नवी प्रजाती

ठाकरेंच्या टीमचं मोठं यश, शोधली नवी प्रजाती

'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन'च्या तिघा संशोधकांनी सापसुरळीच्या नव्या कुळाचा शोध लावला आहे.

तेजस ठाकरे, ईशान अगरवाल यांच्यासोबत कोल्हापूरकर अक्षय खांडेकरही या टीममध्ये आहे.

खांडेकर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी राहिलेले आहेत.

थेट पिल्लाला जन्म देणाऱ्या सापसुरळ्यांच्या पाच नव्या प्रजातींचा शोध या संशोधकांनी लावला आहे. 

भारतीय द्वीपकल्पातील या सापसुरळीची ही पहिलीच नोंद असून एक प्रजाती कोल्हापूर जिल्ह्यात आढळलीय.

तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रात या राज्यांमधे पाच वर्षे यासाठी संशोधन सुरू होते. 

संशोधनासाठी सापसुरळ्यांचे 33 ठिकाणांवरुन 89 नमुने या संशोधकांनी गोळा केले होते.

जर्मनीमधून प्रकाशीत होणार्‍या 'व्हर्टिब्रेट्स झूलॉजी' या नियतकालिकातून संशोधनावर शिक्कामोर्तब झाले. 

अवघ्या 10 वर्षाच्या चार्वीचा विश्वविक्रम