chanakya niti: अशा लोकांपासून चार हात लांबच राहा 

आचार्य चाणक्य यांनी कोणत्या प्रकारच्या लोकांपासून दूर राहावे, याविषयी सांगितले आहे.

आचार्य चाणक्य हे एक महान मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि नीतिशास्त्रज्ञ होते. आचार्य चाणक्यांनी अनेक सामान्य सांसारिक गोष्टी सांगितल्या आहेत.

आचार्य चाणक्य यांच्या सल्ल्याने जीवनातील अनेक अडचणी टाळता येतात.

आचार्य चाणक्य म्हणतात की, चुकीची कामे करणाऱ्यांपासून नेहमी दूर राहा.

अशा लोकांसोबत राहिल्यास तुमचे आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते.

आपण कधीही मुर्खांना शहाणपणाच्या गोष्टी सांगायला जाऊ नये आणि त्यांच्याशी मैत्रीही वाढवू नये, असे चाणक्य सांगतात.

कारण ते कधीच कोणाचंही काहीच ऐकत नसतात आणि तुम्हालाही त्रास देऊ शकतात.

स्वार्थी लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. ज्या महिला कुटुंबाचा विचार न करता फक्त स्वतःचा विचार करतात त्यांच्यापासून दूर राहिलेले बरे.

जे लोक केवळ पैशाचा विचार करतात किंवा वारंवार आर्थिक अडचणीत असतात, अशा लोकांपासून दूर राहणे चांगले. येणाऱ्या काळात ते तुम्हाला आर्थिक अडचणीतही टाकू शकतात.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही