या दिवशी लग्नगाठ बांधणार आमिर खानची लेक!

या दिवशी लग्नगाठ बांधणार आमिर खानची लेक!

बॉलिवूड स्टार आमिर खानची मुलगी इरा खान लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

आयरा खानने मराठमोळ्या नुपूर शिखरेसोबत थाटामाटात साखरपुडा केला होता.

दोघांनी नोव्हेंबर 2022 मध्ये साखरपुडा केला होता. 

तेव्हापासून त्यांच्या लग्नाबाबत बरीच चर्चा होत आहे.

आता खुद्द आमिर खानने लेक आयरा खानच्या लग्नाची तारीख सांगून टाकली आहे.

फिल्मस्टार आमिर खानने नुकतेच न्यूज 18 इंडियाशी बोलताना आयराच्या लग्नाबत मोठी अपडेट दिली आहे. 

आयरा आणि नुपूर 3 जानेवारी 2024 मध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. 

आमिर खानने यावेळी त्याचा भावी जावई नुपूर शिखरेचे कौतुक केले आहे. 

यासोबतच त्याच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी तो खूप रडणार असल्याचं आमिर म्हणाला आहे .