वेड लावी जीवा! अमृता खानविलकरनं केलं घायाळ...
लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
अमृताचा मोठा चाहतावर्ग आहे.
अमृता सध्या झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं परीक्षण करत आहे.
याच कार्यक्रमासाठी अमृताने सुंदर लूक केला होता. तिने नुकतंच हे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अमृताने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.
पांढऱ्या साडीवर अमृताने डिझायनर ब्लाऊज घातला आहे, तसंच ग्लॅमरस मेकअप केला आहे.
या पांढऱ्या साडीवर अमृतानं मिनिमल ज्वेलरी घालत हा लूक पूर्ण केला आहे.
या साडीत अमृता खूपच सुंदर दिसत आहे.
अमृताचा हा अंदाज पाहून चाहते कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकलेले नाहीत.
जान्हवी कपूरची संपत्ती वाचून व्हाल थक्क
जान्हवी कपूरची संपत्ती वाचून व्हाल थक्क