जगभरातील हजारो टोप्यांचा केला संग्रह
एखादा छंद असेल तर आयुष्य समृद्ध होते. छंदामुळे व्यक्तीची नवी ओळख निर्माण होते.
कुणाला पोस्टाची तिकीटं जमवण्याचा छंद असतो तर कुणाला गणपतीची मूर्ती जमविण्याचा.
कल्याणमधल्या अनंत जोशी यांना देशविदेशातील टोप्या जमवण्याचा छंद आहे.
त्यांच्याकडे तब्बल साडे तीन हजार पेक्षा अधिक युद्धकालीन, शिरस्त्राण, जिरेटोप, पगड्यांचा संग्रह आहे.
जोशी हे गेल्या तीस वर्षापासून हा आपला अनोखा छंद जोपासत असून शिरोभूषण नावाच्या संग्रहालयात हा ठेवा त्यांनी जोपासला आहे.
मराठा, राजपूत मुघल काळातील युद्धकालीन शिरस्त्रांण, जिरेटोप यांचा खजिना त्यांच्याकडे आहे.
त्याचबरोबर ब्रिटन, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, चीन , पगड्या , युद्धकालीन शिरस्त्राण जिरे टोप ही त्यांच्या संग्रही आहेत.
पुण्यात राहण्यासाठी स्वस्तात मस्त हॉटेल्स
Learn more