अंकिता आणि विकीचे बेडरूम फोटोज व्हायरल!

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपं म्हणजे अंकिता लोखंडे आणि विकी जैन.

दोघेही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात.

नुकतंच या दोघांना एकत्र येऊन 6 वर्ष पूर्ण झाले.

अंकिता लोखंडे आणि विकी यांनी 14 डिसेंबर 2021 रोजी लग्नगाठ बांधली होती.

पण लग्नाआधी तीन वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत होते.

आता आपल्या  6 व्या डेट ऍनिव्हर्सरी रोजी अंकिताने खास फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये अंकिता आणि विकी सजवलेल्या बेडवर रोमँटिक अंदाजात बसलेले दिसत आहेत.

फोटोमध्ये दोघेही पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ट्विनिंग करताना दिसत आहेत.

अंकिता आणि विकीचे हे बेडरूम फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.