वामिका अन् अकाय; विरूष्काच्या मुलांच्या नावाचा काय आहे अर्थ?

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का प्रेग्नंट असून लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याची चर्चा होती.

आता अखेर अनुष्का आणि विराटच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे.

अनुष्काने एका मुलाला जन्म दिला आहे.

अनुष्का आणि विराटने आपल्या या बाळाचं नाव ‘अकाय’ असं ठेवलं आहे.

‘अकाय’ हा तुर्की शब्द आहे. त्याचे अनेक अर्थ आहेत. तुर्कीमध्ये याचा अर्थ चमकणारा चंद्र असा होतो.

या नावाची आणि त्याच्या अर्थाची खूपच चर्चा होतेय.

अनुष्का विराटने त्यांच्या मुलीचही नाव असच युनिक ठेवलं होतं.

वामिका हे नाव विराट आणि अनुष्काच्या नावांवरून तयार करण्यात आलं होतं.

विराटचं अक्षर 'व' आणि अनुष्का मधील 'का' असं वामिका हे नाव ठेवण्यात आलं होतं.