भारतामध्ये अनेक प्रकारचे परदेशी पदार्थ प्रसिध्द आहेत.
भारतातील लोक ते पदार्थ अगदी आवडीने खातात त्यातीलच एक म्हणजे अरेबिक कुनाफा.
तोंडाला पाणी आणणारी हि डिश असून तुम्ही दुधाच्या शेवया, शीरखुर्मा बरेचदा खाल्ला असेल पण कुनाफाची चव खूप छान लागते.
पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर भागात असणाऱ्या कुनाफा लॉन्ग या ठिकाणी तुम्हाला 10 वेगवेगळे कुनाफा मिळतात.
यामध्ये लोटस कुनाफा, ओरिओ कुनाफा, बाऊंटी कुनाफा, कॅरेमल कुनाफा असे 10 वेगवेगळे प्रकार मिळतात.
या कुनाफाची किंमत ही 200 रुपयांपासून 400 रुपये आहे.
या ठिकाणी कॉलेजवयीन मुलं कुनाफा खाण्यासाठी आवर्जून येतात.