भात बनवताना तुम्ही तर करत नाही ना या चुका?

बरेच लोक घाईत तांदूळ 3-4 वेळा नीट धुत नाहीत.

त्यामुळे तांदूळ सुट्टा होण्याऐवजी चिकट होतो.

उच्च आचेवर भात शिजवू नका, अन्यथा पोत खराब होऊ शकते.

शिजवताना भात जास्त ढवळला तर तो फुटतो किंवा तुटतो

तांदळात कमी-जास्त पाणी टाकल्याने तो ओला रहातो किंवा कमी शिजतो.

वेगवेगळ्या प्रकारच्या तांदळांना शिजवण्यासाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो.

उदाहरणार्थ, पांढरा तांदूळ लवकर शिजतो तर तपकिरी तांदूळ उशीरा शिजतो.

या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही परफेक्ट भात बनवू शकता.