Astro Tips: पूजेसाठी या धातूची भांडी चुकूनही वापरू नये

पूजा-विधींमध्ये अनेक प्रकारचे साहित्य, भांडी वापरली जातात.

विशेषतः लोटा (तांब्या), पूजेचे ताट, वाटी, दिवा, घंटी इ. वस्तू वापरतात.

ज्योतिषी भूपेंद्र शर्मा सांगतात की, पूजेमध्ये काही धातू निषिद्ध मानले जातात.

पूजेसाठी सोने, चांदी, पितळ आणि तांब्यापासून बनवलेल्या भांड्यांचा वापर शुभ मानला जातो.

या धातूंच्या वापरानं देवी-देवता लवकर प्रसन्न होतात, असे मानले जाते

या धातूंचा स्पर्शही आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतो.

या धातूंमुळे अनेक आजारांपासूनही आपला बचाव होतो.

पूजेत लोह, पोलाद आणि अॅल्युमिनियम या धातूंपासून बनवलेली भांडी वर्ज्य आहेत.

धार्मिक कार्यात हे धातू वापरले जात नाहीत, या धातूंना पूजेसाठी अशुद्ध धातू मानलं जातं.

या धातूंपासून मूर्तीही बनवल्या जात नाहीत.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही