दिवाळीसाठी ‘इथं’ करा हटके दिव्यांची खरेदी

दिवाळी म्हटलं तर सर्वत्र आनंद उत्साहाचे वातावरण असतं. दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

त्यामुळे दिवाळीसाठी लागणाऱ्या साहित्यानी दुकाने सजलेली पाहिला मिळत आहेत.

दिवाळीला सर्वत्र दिव्यांचा झगमगाट पाहिला मिळतो. यासाठी दिव्यांची खरेदी केली जाते.

त्यामुळे तुम्हाला यावर्षी दिवाळीसाठी हटके दिव्यांची खरेदी छत्रपती संभाजीनगर कुठे करता येईल याबद्दल माहिती सांगणार आहोत.

छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा भागातील ईनोरी क्राफ्ट यांनी यंदाच्या दिवाळीसाठी खास असे पेबल आर्ट्स पासून दिवे हे तयार केलेले आहेत.

हे दिवे एकदम पर्यावरण पूरक असे दिवे आहेत. तसेच यांचा तुम्ही पुनर्वापर सुद्धा करू शकता.

या दिव्यांमध्ये तुम्हाला छान छान अश्या डिझाईन सुद्धा मिळतील. जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हे दिवे अत्यंत बेस्ट असा पर्याय आहेत.

या दिव्यांची किंमत 299 रुपयांपासून 400 रुपये आहे.

20 रुपयांपासून 'इथं' करा फर्निचर खरेदी