भरतकामाचा विचार केला तर चिकनकारी निःसंशयपणे या यादीत अव्वल आहे.
या सुंदर तंत्राचा उगम लखनऊमधून झाला आणि इथे अनेक सुंदर चिकनकारी साड्या बनवल्या जातात.
एखादा लग्नसमारंभ असेल आणि साड्या नेसायची वेळ येणार असेल तर अनेक महिलांना जड आणि भरलेल्या साड्या घालायला नकोसं होऊन जातं.
त्यामुळे अनेक जणांची एलिगंट लुक चिकनकारी साडीला पसंती असते.
पुण्यात चिकनकारी साड्यांचं खास मार्केट असून इथं 2 हजार रुपयांपासून साड्या मिळतात.
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर असलेल्या लखनौ चिकन पॅलेस दुकानात अस्सल चिकनकारी साड्यांचं कलेक्शन आहे.
2 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपये किमतीच्या साड्या या ठिकाणी मिळतात.
तुम्ही चिकनकारी साड्या त्यांच्या धाग्याने आणि नाजूक फॅब्रिकद्वारे सहजपणे ओळखू शकता.