रस्त्यावरील शवरमा खाणं टाळा, धक्कादायक माहिती समोर
कर्नाटकातील आरोग्य विबागाने उघड्यावर विक्री होणाऱ्या मांसावर कारवाई केली आहे
खरंतर आरोग्य विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल झाली होती, त्यानंतर आरोग्य विभागाने शावरमा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे.
संपूर्ण राज्यातून तक्रारी आल्यानंतर शवरमा विक्रेत्यांवर कारवाई सुरू करण्यात आली.
सरकारने ग्राहकांना अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना असलेल्या हॉटेल्समधून जेवण खरेदी करण्यास सांगितले
आरोग्य अधिकाऱ्यांनी
10 जिल्ह्यांतील शवरमाचे नमुने गोळा केले आहेत
17 नमुन्यांपैकी 9 नमुने फक्त सुरक्षित आढळले, उर्वरित नमुन्यांमध्ये बॅक्टेरिया आणि यीस्टचे अंश सापडले.
हे स्वच्छतेशिवाय स्वयंपाक किंवा बराच वेळ मांस साठवल्यानंतर होतं
रस्त्यावरील दुकानदारांकडे स्वच्छता नसते, अशावेळी तेथील पदार्थ न खाणंच चांगलं
शवरमाच नाही तर कोणताही रस्त्यावरील पदार्थ खाणं लोकांनी थांबवलं पाहिजे.