अयोध्या

विमानाचे तिकीट दर

अयोध्‍येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्‍ठा विधी पूर्ण झाला आहे.

या उत्सवानिमित्त नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भारतातील प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं हा क्षण साजरा करत आहे.

या संबंधी विमान कंपनी स्पाईसजेटने मोठी घोषणा केली आहे.

स्पाइसजेट स्वस्त तिकीट दरात ग्राहकांना अयोध्येला घेऊन जाईल.

कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त दरातील फ्लाईट घोषित केली आहे.

देशातील विविध शहरांमधून ही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

देशातील प्रमुख शहरांमधून 1622 रुपयांना फ्लाइट तिकीट मिळणार आहे.

1622 रुपयांमध्ये तुम्ही मुंबई-गोवा, दिल्ली-जयपूर आणि गुवाहाटी-बागडोगरा देखील जाऊ शकता.

याशिवाय अन्य काही शहरांसाठी देखील अशी स्वस्त तिकिटे ठेवण्यात आली आहेत.