लग्नाच्या 7 लाखाच्या शेरवानीमुळे बाबर आझम क्रिकेट प्रेमिंकडून ट्रोल, पण का?
मंगळवारी म्हणजेच आज ईडन गार्डनवर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात क्रिकेट सामना खेळला जात आहे.
यासाठी पाकिस्तानी संघ शनिवारीच कोलकाता येथे पोहोचला आहे.
दरम्यान, पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम वादात आला आहे.
कोलकात्यात खरेदी करताना त्याने 7 लाख रुपयांची डिझायनर शेरवानी ऑर्डर केली.
त्याने त्याच्या लग्नासाठी ही शेरवानी खरेदी केली आहे.
एवढेच नाही तर त्याने कोलकाता शहरातील एका प्रसिद्ध ज्वेलर्सकडून लाखो रुपयांचे दागिने मागवले आहेत.
आता अशा वेळी जेव्हा पाकिस्तानी संघ विश्वचषकात खराब कामगिरी करत आहे.
अशा परिस्थितीत बाबर आझमची ही शॉपिंग ज्यामुळे तो वादात सापडला आहे.
इतकंच नाही तर एका हाय-प्रोफाइल मॅचच्या आधी बिर्याणी खाल्ल्यानं त्याच्यावर आणि टीमवर टीकाही झाली आहे.