बांधणीचे ड्रेस स्वस्तात करा खरेदी; मुंबईत कुठे?
बांधणीचे ड्रेस हा प्रकार महिलांमध्ये सध्या चांगलाच लोकप्रिय असून कोणत्याही गटातील महिलांना हे ड्रेस शोभून दिसतात.
गुजरातमधील बांधणीचे ड्रेस विशेष प्रसिद्ध आहेत. आता मुंबईतही या ड्रेसचं चांगलं मटेरियल आणि तेही स्वस्तामध्ये मिळते.
मुंबईच्या
दादर मार्केटमधील राजलक्ष्मी क्रिएशन या दुकानात विविध रंगाचे आणि पॅटर्नचे बांधणीचे ड्रेस मटेरियल मिळतात.
अगदी अस्सल कॉटनची बांधणी असल्यामुळे या ड्रेसला चांगली मागणी आहे.
लग्नसमारंभ किंवा घरगुती कार्यक्रमात या प्रकारचे ड्रेस घालण्यास अनेक महिलांची पसंती असते.
बांधणी ही कापडावर विशिष्ट पद्धतीने गाठ बांधून तयार केली जाते.
कॉटन, सिल्क अश्या विविध प्रकारच्या कपडावर ही डिझाईन तयार केली जाते.
500 रुपये ते 1000 रुपयांच्या आत बांधणी ड्रेस मटेरियल मिळतात.
स्वस्तात मस्त ज्वेलरीची ‘इथं’ करा खरेदी!