दारुची नशा, अंडा आणि मर्डर मिस्ट्री

दारुच्या नशेत एका व्यक्तीनं अंडा भुर्जी विकणाऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर घडलीय. 

अंडा भुर्जी विकणाऱ्यानं अंड फुकट दिलं नाही म्हणून नशेत असलेल्या व्यक्तीनं त्याला मारहाण केली.

फुकट अंडी न दिल्याच्या कारणावरून अंडा भुर्जी विक्रेत्याला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. 

या मारहाणीत विक्रेता गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या विक्रेत्याचं नाव शहाबाज पठाण होतं तर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव प्रवीण मोरे. 

समोर आलेली ही घटना बारामती येथील आहे.

बारामतीतील TC कॉलेजच्या रोडवर हा प्रकार घडला.

या घटनेतील आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे