दुष्काळात अमेरिकन फळाची लागवड; कुठं पाहा  

शेतीमध्ये नफा मिळवायचा असेल तर लागवडीची, पिकांची पद्धत ही बदलली पाहिजे.

शेतीचा पॅटर्न बदलला तर नफा मिळतो, हे यापूर्वीही सिद्ध झालंय.

बीड सारख्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांनीही आता शेतीत प्रयोग सुरू केलेत.

बीड जिल्ह्यातल्या शिवनी येथील शेतकरी परमेश्वर थोरात यांनी अमेरिकन फळाची शेती केली असून त्यामधून लाखोंची कमाई केलीय.

अमेरिकेतल्या मॅक्सिमा विद्यापीठानं विकसित केलेल्या एवोकोडा या फळाची लागवड त्यांनी शेतीत केलीय.

 परमेश्वर यांनी पहिल्यांदा बंगळुरच्या हरी आली विद्यापीठातून 2018 साली या फळाची 5 रोपं आणली होती.

त्यांनी या रोपाची नंतर कलनं तयार केली. 

 ही कलमं तयार झाल्यावर जवळपास दीड एकर क्षेत्रावर 150 झाडांची लागवड त्यांनी केली.

एवोकोडा फळाच्या लागवडीसाठी त्यांना वर्षभरात 30 हजार खर्च आलाय.

सध्या या फळाला 700 ते 800 रुपये प्रती किलो दर मिळतोय.

त्यामुळे त्यांना यामधून पाच ते सहा लाखांचं उत्पन्न मिळतंय.