मोसंबी शेतीतून लाखोंची कमाई
मोसंबी शेतीतून लाखोंची कमाई
सध्याच्या काळात पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले आहेत.
हवामान अनुकूल असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कल मोसंबीच्या शेतीकडे असतो.
बीड जिल्ह्यातील शिरसमार्गचे शेतकरी संभाजी पवळ यांनी आपल्या शेतात मोसंबीची बाग लावली.
आता या मोसंबीच्या शेतीतून ते वर्षाला 20 लाखांचा निव्वळ नफा मिळवत आहेत.
शेतकरी संभाजी पवळ यांना 40 एकर शेती असूनही उत्पन्न मिळत नव्हते.
पवळ यांनी 2002 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर 4 एकर क्षेत्रावर मोसंबीची लागवड केली.
2011 साली त्यांनी 16 एकर क्षेत्रावर 16×16 या लागवड पद्धतीने मोसंबी लागवड केली.
मोसंबीची न्यू शेंलार जातीची 2500 रोपे लावताना मशागतीसाठी प्रति एकरी 50 हजार खर्च आला.
गतवर्षी 120 टन मोसंबीतून 32 लाखांचं उत्पन्न मिळालं आणि खर्च जावून 20 लाखांचा नफा राहिला.