सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यावं का?

सकाळी उठल्यावर पाणी प्यावं असं अनेक लोक म्हणतात. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम उद्भवतो.

पाणी हे दात घासण्या आधी प्यावं की दात घासल्यानंतर? याबद्दल अनेकांना माहिती नाही.

सकाळी उठल्याउठल्या दात न घासता पाणी पिणं चांगलं नाही असं अनेकांना वाटतं. 

रात्रभर झोपेत आपल्या तोंडातील लाळेमध्ये (Salvia) काही जंतू (Bacteria) असतात असा समज आहे.

मात्र हा फक्त समज आहे आणि त्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

तुम्ही उठल्यावर दात न घासता पाणी प्यायलात तर ही लाळ पाण्याबरोबर तुमच्या पोटात जाते आणि तिथे जास्त प्रमाणात असलेल्या आम्ल म्हणजेच ॲसिडमुळे त्यातील जंतू (Bacteria) मरतात.

त्यामुळे दात घासण्याआधी पाणी पिणं हे अजिबात धोकादायक नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

रिकाम्यापोटी दोन ग्लास किंवा कमीतकमी एक ग्लास तरी पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. आमचं उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही.