भारतीय घर आणि हॉटेलमध्ये जेवल्यानंतर खाण्यासाठी बडीशेप दिली जाते.
जेवणानंतर बडीशेप खाण्यामागे वैद्यकीय कारणं आहेत.
बडीशेपेमुळे तोंडाची चव तर वाढतेच, पण आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.
तेव्हा बडीशेपेच्या सेवनाने आरोग्याला नेमके कोणते फायदे मिळतात हे जाणून घेऊयात.
बडीशेपेमध्ये ऍनेथॉल, फायबर, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात.
ऍनेथॉल पोटातले एंझाइम्स सक्रिय करते आणि त्यामुळे अन्न लवकर पचतं.
फायबर्स पचनास मदत करतात आणि पोटाच्या समस्या दूर होतात. बडीशेपेमुळे गॅस, अपचनासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
बडीशेप खाल्ल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते आणि फ्रेशनेस वाढतो.
बडीशेपमुळे मेटॅबॉलिझम वाढण्यास मदत होते. परिणामी वजन कमी करण्यासदेखील मदत होते.
बडीशेपेमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे घटक शरीरातल्या पेशींना फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.
बडीशेपेमध्ये पोटॅशियम असतं. हा घटक ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)